क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

खोटे शिक्के मारुन बोगस रेशनिंग कार्ड बनविणा-या दोघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

निगडी(वास्तव संघर्ष) : रेशनिंग कार्ड काढून देतो म्हणून पैसे घेवून नागरिकांना बनावट रेशनिंग कार्ड तयार करुन त्यावर खोटे शिक्के मारुन व बनावट सह्या करुन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकुर्डीतील संत तुकाराम व्यापारी संकुल पार्किंगमध्ये घडली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अल्ताफ महंमद शेख( वय- २ ९, रा . जय मल्हार हौसींग सोसायटी टॉवर लाईन , त्रिवेणीनगर , तळवडे पुणे ) राजेंद्र दादा कसबे (वय ५५ वर्षे रा . स्वराज कॉलनी , नढेनगर , काळेवाडी , पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अजून अटक करण्यात आली नाही.

याप्रकरणी सतिश जालींदर ढोले पोलीस हवालदार , यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी अल्ताफ आणि राजेंद्र यांनी संगनमत करुन लोकांकडून रेशनिंग कार्ड काढून देतो म्हणून पैसे घेवून त्यांना कोणतेही अधिकार नसताना फसवणुक करण्याचे उद्देशाने बनावट रेशनिंग कार्ड तयार करुन त्यावर परिमंडळ अधिकारी , अ विभाग , निगडी , पुणे ४११०४४ व सहाय्यक परिमंडळ अधिकारी फ विभाग , पुणे ५ , परिमंडळ अधिकारी फ विभाग , पुणे यांचे खोटे शिक्के मारुन व बनावट सह्या करुन खोटा दस्तऐवज तयार केला. आणि नागरिकांची फसवणूक केली त्यानुसार या आरोपी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: