सासरच्या ञासाला कंटाळून विवाहीतेने केली आत्महत्या ;पतीसह सासरच्या मंडळीवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल
भोसरी (वास्तव संघर्ष) :लग्नाला सात महीने झाले होते माञ लग्नानंतर वारंवार पैशाची मागणी सासरच्या लोकांनी करत विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. हा ञास सहन न झाल्याने त्या विवाहितेने घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि १९)रोजी दुपारच्या दोनच्या सुमारास भोसरी येथे घडली आहे.
उत्तम राजेश्वर मोकाशी( वय-५१ वर्षे , रा.चक्रपाणी वसाहत , राममंदिरा समोर , मराठा बिल्डीग शेजारी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पती-तुकाराम चंद्रकांत मुद्रासे( वय २७ वर्षे रा.पांडवनगर नं ०२ , मयुरा मेडीकल च्या पाठीमागे , चक्रपाणी रोड भोसरी ) सासु-उर्मिला चंद्रकांत मुद्रासे (वय ४८ वर्ष )सासरे- चंद्रकांत बाबु मुद्रासे (वय ५४ वर्ष ) ननंद-महादेवी दत्तात्रय मोकाशे( वय २४ वर्ष रा.मु.पो. कलकोटी ) चुलत ननंद-शामा शिवराम मोकाशे (वय २३ वर्ष रा.आजमसोंडा खुर्दे , ता.चाकुर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती-तुकाराम मुद्रासे आणि त्याची बहीण आरोपी महादेवी यांनी फिर्यादी उत्तम राजेश्वर मोकाशी यांची मुलगी विद्या तुकाराम मुद्रासे (वय २६ वर्ष हीस तिचे लग्न दिनांक १४/०५/२०२० रोजी झाले पासुन दिनांक १ ९ / ११ / २०२० रोजी पर्यंत आरोपी पती तुकाराम आणि अन्य आरोपी यांनी तीला माहेरून सोन , संसार उपयोगी वस्तु , भांडे आण म्हणून वारंवार शारीरीक व मानसीक त्रास देवुन मारहाण केली, तसेच तीला त्रास देण्यासाठी घरात भांडणे लावणेसाठी फुस दिली त्यामुळे आरोपींनी विद्या हीचा हुंडा व इतर कारणासाठी छळ केला. म्हणुन विदया हीने दिनांक १ ९ / ११ / २०२० रहाते घराच्या टेरेस वरुन खाली उडी मारुन आत्महत्या केली आहे . त्यानुसार पोलिसांनी पती व सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहेत.