क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कपड्याच्या ब्रँडचा गैरवापर करून डुप्लिकेट ब्रँडची विक्री

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी मधील चार दुकानदारांनी एका कपड्याच्या ब्रँडचा गैरवापर करून खऱ्या ब्रँडची कपडे असल्याचे भासवून त्याची विक्री केली.याप्रकरणी चार दुकानदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 3) दुपारी उघडकीस आला.


सिद्धेश सुभाष शिर्के यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


कमलेश राजेंद्रप्रसाद यादव( वय- 42 रा .काळेवाडी)अब्दुल हन्नान मेहंदी मंसूरी (वय 40, रा. काळेवाडी) राजेश भगवानदास लालचंदानी( वय 45, रा. पिंपरी)शफिक गुलमोहम्मद शेख (वय-45, रा. काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कपड्यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचा लोगो वापरून आरोपींनी कपड्यांची विक्री केली.  याबाबत माहिती मिळाली असता फिर्यादी यांनी पिंपरी मधील एसपी ट्रेडर्स, खुशी ड्रेसेस, सत्यम कलेक्शन, वनूर कलेक्शन या दुकानांमध्ये पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस  करीत आहेत

Share this: