सकाळी अंघोळ केल्यानंतर सावत्र बाप करायचा असे काम;अखेर मुलीने घेतली पोलीसांत धाव
सांगवी (वास्तव संघर्ष) :मुलींसाठी आपले घर म्हणजे सर्वात सुरक्षीत ठिकाण मानले जातेजाते. मात्र काही ठिकाणी याच घरामध्ये लिंगपिसाट हैवान रहातात ते या मुलींना गिळू का चावू असे वागताना दिसतात.असाच एक प्रकार सुमारे पाच वर्षापासून ते शनिवारी (दि.3) रोजी सकाळी साडे आठच्या दरम्यान पवारनगर साई धाम बिल्डींग सांगवी येथे उघडकीस आला आहे.
याबाबत पिडीत महिला फिर्यादीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सावत्र वडील नामदेव भाऊसाहेब जोशी (वय-50,रा.पवारनगर साई धाम बिल्डींग सांगवी) या आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा सावत्र वडील आरोपी नामदेव जोशी सुमारे पाच वर्षापासून ते आजपर्यंत फिर्यादी महिलाकडे अश्लिलतेने पाहुन फिर्यादी महिला सकाळी साडेआठच्या दरम्यान आंघोळीवरुन आलेनंतर मोबाईलमध्ये फोटो काढणे पाठलाग करणे , फिर्यादीस वेगवेगळया फोनवरुन कॉल करुन अश्लिल बोलणे , फिर्यादीचे अंगाला स्पर्श करुन मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे तसेच याबाबत कुठे काही सांगितले तर फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.अधिक तपास सांगवी पोलीस करित आहेत