‘तो’ नियम मोडल्यास पोलीसांवरच होणार कार्यवाही;पोलीस महासंचालकांचे आदेश
पिंपरी (वास्तव संघर्ष) : वाहतूक करताना किंवा गाडी चालवताना सामान्य नागरिकांना जसे कायद्याने नियम दिले आहेत तसे नियम पोलीसांना देखील आहेत. यातीलच काही नियम पोलीसांनी मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.अनेक वेळा आपण पाहिलं असेल की वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो काढण्यासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करण्यात येतो.याद्वारे ते वाहन चालकांवर दंड देखील ठोठावत असतात मात्र अशा पोलीसांवर कार्यवाही होणार असल्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी आदेश दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे की, पोलीस घटकातील पोलीस अधिकारी / अंम लदार कसूरदार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना स्वतः च्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो किंवा चित्रीकरण करून काही कालावधी नंतर ई चलान मशिन मध्ये अपलोड करतात तसेच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचा फोटो टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे हे ओळखणे अशक्य होते अशा आशयाची तक्रार अर्ज प्राप्त झाली आहे.
त्यानुसार आदेशित करण्यात येते की वाहनचालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चलान मशिनचाच वापर करावा लागणार आहे. जे वाहतूक पोलीस कारवाईवेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी काढले आहेत.