क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

त्याने तर थेट डॉक्टरच्या कानाखालीच वाजवली

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीतील डॉ.डि.वाय.पाटील मेडीकल हॉस्पीटलमधील एका पेशंटच्या नातेवाईकाने डॉक्टरच्या कानाखाली वाजवत शिवीगाळ केली आहे. ही घटना गुरूवारी (दि.22) राञी पावनेदहाच्या सुमारास घडली आहे.

डॉ.शिवाप्पा रविंद्र देवरमनी यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुर्गेश राजन पुराणीक (वय-28 रा.द अॅड्रेस सोसायटी , एच / मोशी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.डि.वाय पाटील मेडीकल हॉस्पीटल पिंपरी येथे फिर्यादी हे सह वैद्यकीय अधिकारी म्हणुन काम करत असताना येथील ऑर्थोपेडीक वॉर्ड नं-406 येथे पेशंट कालीदास गजानन पुराणीक वय-96,रा.मोशी) यांना कमरेमध्ये फ्रॅक्चर असल्याने त्यांच्यावर उपचार करीत असताना त्यांचा नातु आरोपी दुर्गेश पुराणीक याने पेशंटला कोठेही न्यायचे नाही , तेवढी गरज असेल तर तुमचे कार्डीयाक डॉक्टरांनाच येथे बोलवा व तुम्ही आत्ताच्या आत्ता माझे आजोबांचे ऑपरेशन करा असे म्हणुन त्याने फिर्यादी डॉक्टरच्या कानाखाली मारली व जोरजोरात शिवीगाळ करून गोंधळ केला. महाराष्ट्र आरोग्य सेवा संरक्षण कायदा 2010 चे कलम 4 नुसार आरोपीवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: