‘त्या’ गुन्ह्याप्रकरणी आसवानी यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी विधानसभा 2019 च्या मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती.याप्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.पिंपरी पोलिसांनी माजी उपमहापौर हिरानंद डब्बू आस्वानी सोबत चार जणांना अटक केली होती.

अभिनव सुरेंद्रकुमार सिंग (वय 30, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी (वय 51,रा.पिंपरी) व
त्यांचे तीन कार्यकर्ते साथीदार व इतर धन्नू आसवांनी व राजू आसवांनी यांच्या विरोधात आयपीसी आणि कलम 307,143,147,149 अन्वये 438crpc (1)(4)(5) कलम SC आणि ST POA अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सविस्तर माहिती अशी की, सोमवार (दि. 21) वर्ष 2019 रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अभिनवकुमार सिंग हे आसवानी यांच्या घराजवळून जात असताना आसवानी व त्यांच्या साथीदारांनी सिंग यांची मोटार अडवली. कार्यकर्ते अनिल पारचा, उमाशंकर राजभरव आणि फिर्यादी यांना रस्त्यात अडवून लाकडी बांबू, सिमेंट गट्टू यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणात धन्नू आसवांनी व राजू आसवांनी 3 वर्षांपासून फरार होते. दरम्यान त्यांनी आज रोजी धन्नू आसवांनी व राजू आसवांनी यांनी अटकपूर्व जामीन साठी जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे अर्ज केला होता न्यायालयाने अर्जाचा अभ्यास करून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. कोर्टाने त्यामुळे 27/09/2022 पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची त्यांना मुदत दिली आहे.

Share this: