क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आकुर्डीतील बँक ऑफ महाराष्ट्र येथे दरोडा

आकुर्डी (वास्तव संघर्ष): खाकीतील ‘ दुर्गा ‘ महिला पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांची धाडसी कामगिरीमुळे दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीला पिस्तुलासह जेरबंद करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी (दि.26) रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे घडली आहे.

प्रमोद नामदेव चांदने,जयदीप मधूकर चव्हाण, संतोष अभिमान चोथवे( रा- मोरे वस्ती चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम ( एच.पी ) पेट्रोलपंपचे कर्मचारी अमोल राजाभाऊ चौधरी हे त्यांचेकडील दोन दिवसाचे जमा झालेले पेट्रोल पंपावरील कलेक्शन 12,00,000 – रुपये बँकेमध्ये भरणा करण्याकरिता दुपारी 1:15 च्या सुमारास आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे आले होते. त्यावेळेस बँकेच्या पाय – या चढत असताना एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी जवळच उभे असलेल्या महिला पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांनी त्यास नागरिकांच्या मदतीने शिताफीने ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचेकडे 1पिस्टल व 4 जीवंत राऊंड मिळून आले.

सदर घटनेची निगडी पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून त्याचेकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यानी आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी दरोड्याच्या उद्देशाने घातक हत्यारासह आले असल्याची कबुली दिली. निगडी पोलीसांनी त्यांचेविरुद्ध भादंवि कलम 393 आर्म अॅक्ट 3( 25) सह म.पो. का . कलम 137 ( 1 ) ( 3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.निगडी पोलीस ठाणेस नेमणूकीस असलेल्या महिला पोलीस अंमलदार सरस्वती काळे यांनी केलेल्या धाडसी कामगिरीमुळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांना दहा हजार रुपये बक्षिस देवून त्यांचे कौतुक केले आहे. तसेच सदर गुन्ह्याचा पुढील तपास निगडी पोलीस ठाणे करीत आहे .

Share this: