क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या आवारात वकिल आणि पोलिस आमने-सामने ;वकिलावर गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यावरून पोलीस आणि वकील यांच्यात वाद होत दोघे आमनेसामने झाले . वाद इतका विकोपाला गेला की, वकिलाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करून धमकावले . ही घटना शुक्रवारी ( दि . 12 ) दुपारी दोनच्या सुमारास घडली . याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका वकिलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

नीलेश चौधरी ( वय ४५ , रा . मधुबन सोसायटी , सांगवी ) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे . याप्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप मारुती बर्गे ( वय 39 ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपरीतील मोरवाडी न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यावरून आरोपी याने त्याची दुचाकी न्यायालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये पार्क करण्यासाठी आणली . त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला थांबविले . तुम्हाला न्यायालयात पूर्णवेळ थांबायचे असेल तरच दुचाकी आतमध्ये पार्क करा , अन्यथा बाहेर पार्क करा , असे फिर्यादी म्हणाले .त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने फिर्यादीने त्या वकिलाच्या विरूद्ध पोलीसात धाव घेतली. अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: