‘नाहीतर मी तुम्हाला तलवारीने कापून टाकेन.. पोलीसालाच दिली भरदिवसा जीवे मारण्याची धमकी

निगडी (वास्तव संघर्ष) : ‘मला पकडू नका, तुम्ही जर मला पकडले तर मी तुम्हाला तलवारीने कापून टाकेन’ असे म्हणत आरोपींनी पोलीसाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवार(दि.18) सायंकाळी साडेचारच्या सुमारास साईबाबा मंदिर अ‍ॅक्सेस बॅकेसमोर प्राधिकरण निगडी याठिकाणी घडली आहे. आरोपींना निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पोलीस नाईक सोनू किसन केंगले यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शाहरुख शाहीद शेख( वय-20, रा . गणेश सोसायटीसमोर , टावर लाईन चिखली), गजानन सहदेव पवार (वय-28, वर्षे रा . मारुती कॉम्लेक्सचे मागे , दत्तवाडी, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार साडेचारच्या सुमारास साईबाबा मंदिर अ‍ॅक्सेस बॅकेसमोर प्राधिकरण निगडी याठिकाणी आरोपींनी एक लोखंडी तलवार जवळ बाळगली होती त्यापैकी आरोपी गजानन पवार याच्या हातातून लोखंडी तलवार घेत असताना त्याने पोलीस नाईक सोनू केंगले यांना म्हणाला ‘तुम्ही मला पकडू नका, तुम्ही जर मला पकडले तर मी तुम्हाला तलवारीने मारुन टाकील असे म्हणुन अंगावर धावुन गेला . व शिवीगाळ करु लागला तसेच आरोपी शाहरुख शेख आणि आरोपी गजानन पवार हे मोठमोठ्याने आरडाओरडा करुन गोंधळ करत होते व पकडलेल्या आरोपींना पोलीस स्टेशनला घेऊन येत असतांना आरोपींनी झटापटी करुन तुम्हाला बघुन घेतो असे म्हणुन शिवीगाळी करुन पुन्हा पोलीस नाईक सोनू केंगले यांच्या अंगावर धावुन गेला. आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Share this: