आरोग्यबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चिखली घरकुल परिसरातील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरुपी मार्गी लावा : निलेश नेवाळे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :शहरात दोन दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. चिखली येथील घरकुल गृहपकल्पातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गेल्या सात वर्षांपासून ही समस्या आहे. पावसाळ्यात जास्त वृष्टी झाल्यास पाणी साचल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही समस्या कायमस्वरुपी मार्गी लावावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संभाजीनगर, चिंचवड येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी ओसंडून वाहते. ते चिखली पेठ क्रमांक 17 आणि 19 येथील घरकुल वसाहतीत शिरते.  घरकुल वसाहतीचे नियोजन करताना या सखल भागात पाणी शिरु शकते, याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले नाही.तसेच, एसटीपी प्लँट आणि पावसाचे पाणी नेवाळे वस्ती चिखली येथे जाते. तिथून पाणी इंद्रायणी नदीत जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.

दरवर्षी येथे पाणी साचून आरोग्याची समस्या निर्माण होते, असे स्थानिक नागरिकांची म्हणणे आहे.महापालिका जल: निस्सारण विभागाने या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणीही निलेश नेवाळे यांनी केली आहे

Share this: