क्राईम बातम्याबातम्या

माहेरहून पाच लाख रुपये आणि कार आणण्याची मागणी करुन विवाहीतेचा छळ

वाकड (वास्तव संघर्ष) :पत्नीला वारंवार वांझोटी बोलून तिचा मानसिक छळ केला तसेच माहेरहून पाच लाख रुपये आणि कार आणण्याची मागणी केली . पतीच्या अनैतिक संबंधांना पत्नीने विरोध केला असता पतीने तिला शिवीगाळ व मारहाण केली . हा हा प्रकार 5 मार्च 2014 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत थेरगाव आणि राजस्थान येथे घडला .

याबाबत पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पती नरेंद्र राकेश बुरट ( वय 30 , रा . चित्तोडगड राजस्थान ) , सासू ( वय 50 ) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पती आणि सासूने फिर्यादी विवाहितेस वारंवार वांझोटी बोलून पाच लाख रुपये आणि चारचाकी गाडीची मागणी केली . फिर्यादी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला . त्यावरून आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण करत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली . आरोपी पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने त्यासाठी फिर्यादी विवाहितेने पतीला विरोध केला . त्यावरून देखील पतीने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत .

Share this: