बातम्या

धक्कादायक: निगडीतील रेशनिंग कार्यालयात ऑनलाईनच्या नावावर रात्रभर पार्ट्या

निगडी (वास्तव संघर्ष):अन्नधान्य व पुरवठा विभागाच्या ‘अ’ (चिंचवड विधानसभा) व ‘ज'(पिंपरी विधानसभा) या दोन परिमंडल विभागाचे कामकाज सध्या निगडी कार्यालयातून सुरू असल्याने येथील कामकाजावर ताण येत आहे अशी एकिकडे येथील कर्मचा-यांची फसवी ओरड दिसून येत आहे.’सरकारी काम सहा महीने थांब’ ही म्हण निगडीतील कर्मचा-यांनी सत्यात कशी आणली याचे भिषण वास्तविक फोटो वास्तव संघर्षच्या हाती लागले आहेत.

निगडीतील रेशनिंग कार्यालयात ऑनलाईनच्या नावावर चालते रात्रभर पार्ट्या

शासनाने सर्व सरकारी कामकाजात पारदर्शकता व्हावी यासाठी ऑनलाईवर काम करावे याचे आदेश सरकारी कार्यालयास दिले आहे .मात्र याही कामात अ-पारदर्शकता कशी आणायची याची अजब शक्कल निगडीतील रेशनिंग कार्यालयातील बाबूनी लावली आहे.ऑनलाईन कामाच्या नावावर याच ऑनलाईनचा फायदा घेत चक्क या कार्यालयातच रात्री १० नंतर पार्ट्या केल्या जातात . सरकारी कार्यालयालाचा निगडीतील या अधिका-यांनी स्वताचे घरच बनवले आहे.दिवसातर नागरिक या कार्यालयात महिनोमहिने चकरा मारून हैराण होतात तरी त्यांचे काम होत नाही.सुत्रांच्या माहीतीनुसार या पार्ट्यामध्ये अधिकारी -कर्मचारी इतके गुंग होतात की पहाटे सात वाजल्याचेही त्यांना कळत नाही .

गोरगरिब नागरिकांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी रेशनिंग कार्ड मिळते पण हेच रेशनिंग कार्ड वेळेवर का मिळत नाही याच हे सत्य वास्तव आहे.गोरगरिब नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे रेशनिंग कार्ड किती दिवसात मिळते याचा खालील तक्ता पहा पण या तक्तानुसार निगडीतील कार्यालयात कामे होतच नाही .

निगडीतील रेशनिंग कार्यालयाच्या वारंवारं तक्रारी अन्नधान्य व पुरवठा विभागाला नागरिक देत असतात परंतू अधिका-यांवर कार्यवाही का होत नाही ?हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.‘अ’ विभागात चिंचवड विधानसभेतील ९७ तर ‘अ’ विभागात पिंपरी विधानसभेतील ८३ रेशन दुकानदारांचा समावेश आहे.

‘अ’ विभागात म्हणजे चिंचवड विधानसभा मतदार संघात २९ हजार ५२४ कार्डधारक आहेत. तर ‘ज’ विभागात म्हणजेच पिंपरी विधानसभा मतदार संघात ८३ हजार ३१६ कार्डधारक आहेत. या कार्यालयात यासाठी दिवसांगणिक नागरिकांची वर्दळ असते यामुळे कामकाजावर परिणाम होतो. नवीन शिधापत्रिका काढणे, नावात दुरुस्ती करणे, नवीन नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करणे. आदी कामांसाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ का लागत आहे . अधिकारी रात्रअपरात्री पार्टीत मश्गुल असतात मात्र नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.निगडीतील रेशनिंग कार्यालयात पार्टी करणा-या अधिका-यावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे

Share this: