बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वायसीएम रुग्णालयातील कोरोना लॅबला व भोसरी रुग्णालयाला स्व.दत्ताकाका साने यांचे नाव द्या – तुषार कामठे

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक दिवंगत दत्ता (काका) साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.साने यांचे शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. गोरगरिबांसाठी त्यांची अग्रही भूमिका असायची. नागरिकांना योग्य व माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण रोखले.

स्व. दत्ता (काका) साने यांचे हे योगदान शहरातील प्रत्येक नागरिक विसरू शकणार नाही.तथापि, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वायसीएम रुग्णालयातील ‘कोव्हिड टेस्टिंग लॅब’ला आणि ‘भोसरी रुग्णालय’ला स्व. दत्ता (काका) साने यांचे नाव देण्याचा निर्णय घ्यावा. त्यांचे नामकरण केल्यास दत्ता (काका) साने यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Share this: