आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक डब्बू आसवानी यांना कोरोनाची लागण

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी उपमहापौर राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक डब्बू आसवानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील चार सदस्यांनाही बाधा झाली आहे.

कोरोनाने राजकीय लोकांना देखील विळखा घातला आहे. शहरातील सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

पिंपरी मतदारसंघातील माजी उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविलेल्या आसवानी यांना आज त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाची तपासणी करुन घेतली. त्यामध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांनाही बाधा झाली आहे.

Share this: