क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दापोडीतील अनधिकृत पञाशेडवर पालिकेची कार्यवाई ;माञ अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दापोडीतील अनधिकृत अतिक्रमण बांधकामावर मोठी कार्यवाई केली आहे. तब्बल ३२ अनधिकृत बांधकाम आणि पञाशेड पाडण्यात आले.

अनधिकृत बांधकाम संदर्भात उच्च न्यायालय चे आदेश केवळ महापालिकेच्या दुर्लक्षामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे थाटण्यात येत आहे यामुळे प्रशासनातील अधिकारी यांचा कुठलाही वचक राहीलेला दिसून येत नाही.

लोकसभेतील आचारसंहितेचा फायदा घेत नागरिकांनी याच काळात सर्वाधिक अनधिकृत बांधकाम करण्यास सुरुवात केली. माञ निवडणूकीचे कारण देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली नाही.

फक्त पञाशेडवर कार्यवाई करुन शहरात चालू असलेल्या पांढरपेशी लोकांची लाखाच्या अनधिकृत घराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. दापोडीतील शितळादेवी चौकातील तब्बल ३२ अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणावर या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

Share this: