बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

यु.टी.डब्लु .टी पद्धतीने रस्त्याच्या कॉक्रेटीकरण कामाचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते भुमीपुजन..!

रहाटणी (वास्तव संघर्ष) रहाटणी प्रभाग क्र २८ पिंपळे सौदागर येथील रहाटणी चौक ते स्मशान भूमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्लु .टी पद्धतीने कॉक्रेटीकरण कामाचे भूमिपुजन आज दि.१२ सप्टेबर २०१९ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर चा रस्ता हा यु.टी.डब्लु .टी पद्धतीने स्मार्ट सिटी सूचनेनुसार बनवण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम हे रहाटणी शिवाजी चौक ते महादेव मंदिर १८ मीटर रुंद व महादेव मंदिर ते स्मशानभूमी पर्यंत ३० मीटर रुंदीच्या या डी.पी रस्त्याचे कॉक्रेटीकरण करण्यात येणार आहे या रस्त्याची लांबी ८५० मीटर इतकी आहे या रस्त्यासाठी अंदाजित खर्च ८ कोटी रुपये इतका आहे.

या रस्त्याचे काम मे.पी.सी.सी.इन्फ्रा.प्रा.लि. हि कंपनी करणार आहे. रस्त्याचे काम हे नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे.

या भूमिपूजन प्रसंगी नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे, श्री. सुदामआपा काटे, शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.संपत मेटे, श्री. माउली हांडे, हभप श्री. विलासभाऊ काटे, श्री. पोपट जगताप, श्री. अर्जुन काटे, श्री. सुर्यकांत काटे, श्री. राजू हांडे, श्री. अजय माकनीकर,श्री. बाळासाहेब भुंडे, श्री. संदीपआबा काटे, पिंपळे सौदागर विठ्ठल रुक्मिणी वारकरी सस्थेचे अध्यक्ष श्री. संदेश काटे ( पाटील ) श्री. सुभाष वाणी, अॅड. प्रसन्न लोखंडे, श्री. सागर भिसे, पंकज काटे, तसेच यावेळी पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थ , जेष्ट नागरिक व शिवशंभो सेवा मंडळाचे व विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थीत होते

Share this: