Video :विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयाची तोडफोड;शहरातील नागरिकांनी व्यक्त केला संताप
चिखली (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली या ठिकाणी असलेल्या जनसंपर्क कार्यालयात अज्ञात तरुणांनी दुपारी ४ च्या सुमारास कार्यालयात येऊन कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे चिखली या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. दुपारी ४ च्या सुमारास कार्यालयात महिला कर्मचारी काम करीत असताना अचानक काही अज्ञात तरुण कार्यालयात शस्त्र घेवून आले. कार्यालयातील साहित्याची तोडफोड करीत काचा फोडून दंगा करून पसार झाले.
या घटनेची माहिती कळताच विरोधी पक्षनेते दत्ता साने व पोलिसांनी घटनास्थळी जावून झालेल्या हल्याची माहिती घेतली. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.
दरम्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांनी झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत हल्लेखोरांना त्वरीत अटक करण्याची मागणी केली. मनपातील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावर दिवसा हल्ला होणे हे निषेधार्थ असून याबद्दल शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.