बातम्यामहाराष्ट्र

सोलापुरातील बसपाच्या तीन नगरसेवकांनी केला बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थित वंचित मध्ये प्रवेश

सोलापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम युतीने दमदार कामगिरी केल्याने वंचित फॅक्टर महाराष्ट्रात गाजला.त्यामुळे वंचित पक्षात प्रवेश करण्यासाठी इतर पक्षातील इच्छुक समोर येत आहेत. यातच आता ०६/०६/२०१९ गुरुवार

काल रोजी संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सोलापुरात दाखल झाले असता, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचा हा दौरा झालेला दिसत आहे. त्यांनी आज सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीचे भूमिका मांडली.

तसेच आज आघाडीचे नेते आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरातील बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती विजय बामगोंडे,माजी नगरसेविका उषा किरण शिंदे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश झाला.

यावेळी ओबीसीचे नेते शंकरराव लिंगे लिंगायत समाजाचे नेते शिवानंद हैबतपुरे तसेच प्रदेश प्रवक्ता आनंद दादा चंदनशिवे, अर्जुन दादा सलगर, व बबन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

Share this: