भाजपमध्ये झालेले परीवर्तन स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा दाखवा- राज्यमंत्री रामदास आठवले
चैत्यभूमी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंचे आवाहन
मुंबई (वास्तव संघर्ष) आंबेडकरी तरुण क्रियाशील आहे. त्यांनी राजकीय सामाजिक मार्ग निश्चित केला पाहिजे. मात्र रोज नवीन रिपब्लिकन गट स्थापन करून समाजाचे भले होणार नाही. समाजाला सत्ता मिळविण्यासाठी एकच रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे. ऐक्य झाले तर रिपब्लिकन पक्षाचे आणखी चार मंत्री होतील. माझे मंत्रिपद घालविण्यासाठी जरी रिपब्लिकन ऐक्य झाले तरी माझी ऐक्यासाठी तयारी आहे. मात्र ऐक्य करून माझे मंत्रिपद घालविण्यापेक्षा आणखी मंत्रीपदे मिळविण्यासाठी समाजाला शासनकर्ती जमात बनविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. चैत्यभूमी येथील अशोकस्तंभा समोर उभारलेल्या विचारमंचावर रिपाइं मुंबई प्रदेश च्या वतीने नवनिर्वाचित केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला.त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सत्कारापूर्वी सांताक्रूझ विमानतळ ते दादर चैत्यभूमी पर्यंत ना रामदास आठवले यांची रथाद्वारे भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांना ना रामदास आठवलेंनी अभिवादन केले.
यावेळी हजारो रिपब्लिकन कार्यकर्ते उपस्थित होते.निळे झेंडे ढोल ताशा आणि आतषबाजीत रिपाइं तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
एनडीए च्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानासमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले. मोदी आणि भाजप हे सांगतात की ते संविधान बदलणार नाहीत.अनुसूचित जातीजमाती चे आरक्षण संपविणार नाहीत. संविधान आणि आरक्षणाचे ते रक्षण करतील असे आश्वासन मोदी देत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप मध्ये परिवर्तन झाले आहे. हे झालेले परिवर्तन स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा दाखविला पाहिजे. आपला समाज भोळाभाबडा आहे. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे.एखाद्यामध्ये परिवर्तन होणारच नाही असा नकारात्मक विचार करणे योग्य नाही हे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी समाजाला समजावून सांगितले पाहिजे. असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यामागे निवडणूका लढून संसदीय राजकारणात समाजाच्या हाती सत्ता मिळवून देणे हे उद्दिष्ट्य होते. त्यामुळे सत्ता हाती घेण्यासाठी आपण एकच रिपब्लिकन पक्ष साकारून निवडणुका जिंकण्याचे काम केले पाहिजे. मला मंत्रीपद मिळते म्हणून काहींच्या पोटात दुखते.मंत्रिपद कसे मिळवायचे हे त्यांना नाही कळत म्हणून मंत्रिपद त्यांना नाही मिळत अशी चारोळी सादर करून ना रामदास आठवलेंनी विरोधकांना टोला दिला. यावेळी विचारमंचावर ना रामदास आठवले यांच्या सुविद्य पत्नी सौ सीमाताई आठवले आणि पुत्र कुमार जित आठवले तसेच रिपाइं चे अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; काकासाहेब खांबाळकर; दिपकभाऊ निकाळजे; कमलेश यादव सिद्धर्थ कसारे;रमेश गायकवाड;सौ शिलाताई गांगुर्डे; ऍड. आशाताई लांडगे;ऍड. अभयाताई सोनवणे;फुलाबाई सोनवणे; दयाळ बहादूरे; डी एम चव्हाण; रमेश मकासरे;श्रीकांत भालेराव परशुराम वाडेकर; सूर्यकांत वाघमारे; प्रकाश लोंढे;जगदीश गायकवाड;संजय भिडे; चंद्रकांत कसबे;अण्णा रोकडे;घनश्याम चिरणकर;सचिनभाई मोहिते; चंद्रकांत जगताप;चंद्रशेखर कांबळे; अंकुश गायकवाड;शांतू डोळस;बाळासाहेब मिरजे; सिद्राम ओव्हाळ; एम एस नंदा; फादर सुसाई ;सोना कांबळे;बाळासाहेब गरुड; प्रकाश जाधव; हरिहर यादव; संजय डोळसे; रवी गायकवाड; हेमंत रणपिसे;सौ अनिता अलंकार जाधव;सौ नैना संजय वैराट; मीना साळवे; गौतम गायकवाड; विनोद जाधव;भाग्यराज परिहार; भरत पाईकराव; सुनील शिरसाट आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्तर भारतात रिपाइं लोकप्रिय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीतून भोजपुरी भाषेतील ” देश का नेता कैसनबा; आठवलेसाहब जैसनबा ” अशा घोषणा येत होत्या .या घोषणेला ना रामदास आठवलेंनी ही दाद दिली.