बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांच्या उपेक्षित माणण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी संघ मुख्यमंत्र्यांना भेटणार:- विजय सुर्यवंशी

पनवेल(वास्तव संघर्ष) -समाजात घङणा-या घटनांचे वार्तांकन करून माहिती आपल्या पर्यत पोहोचविणेकामी पत्रकार अहोरात्र काम करताना अनेक अग्निदिव्यातून जावे जाते.समाज प्रबोधन व जनजागृती करणा-या पत्रकारांना सामाजिक स्वास्थ्य व स्थैर्य मिळवून देण्यासाठी संघाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात.
आपल्या देशात सर्व सामान्यान पासून ते वरिष्ठ पातळीवर सर्वांनी न्याय/प्रबोधन/मंथन/जागृती/प्रसिद्धी देण्याचं काम पत्रकार करित असतो.लोकशाही चा चौथा स्तंभ असताना देखील हा स्तंभ च आपल्या न्याय व हक्कासाठी वंचित आहे.आज आमदारांच्या मानधनात तब्बल 40000 हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र गेली अनेक दशके पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी संघर्ष करून देखील न्याय मिळत नाही. पत्रकारांसाठि कोणीही आवाज उठवत नाही.सरकार ची इच्छा शक्ती नाही. कोणत्याही सुविधा नाहीत..

पत्रकार हाा सामाजिक प्रश्नांविषयी सजग आणि सक्रीय असतो. आमचे अवघे पत्रकार मंडळ म्हणजे आपापल्या क्षेत्रात तेजाने तळपणारे नक्षत्रमंडळ च असते.

पत्रकारांची तडफ आणि हिंमत सह्याद्रीसारखी कणखर असते, मने आभाळासारखी मोठी असतात. बातमीकडे फक्त बातमी म्हणून पाहत नाहीत , ती घटना आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे असे समजून च लिखाण करित असतात.
पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांना पायबंद घालण्यासाठी राज्य सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पत्रकारांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करणार्‍या विधेयकाला आज विधानसभा व विधानपरिषदेने मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडले आणि ते एकमताने मंजूर करण्यात आले.
. परंतू, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने कायदा केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांना अनेक ठिकाणी बातमीसांठी शहराबाहेर जावं लागतं. खासदार आणि आमदारांना सर्व टोलनाक्यावर विनामूल्य प्रवास सवलत आहे. त्याच प्रमाणे ज्या वृत्तपत्रांना RNI अशा संपादकांना तरी टोल माफ करावा या मागणी साठि महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे संघाचे संस्थापक-अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

Share this: