सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीवर ईडीची छापेमारी
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड येथील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीवर आज (दि.27)रोजी ईडीने छापेमारी केली आहे.अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने पुणे जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु होती.अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे
सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे 124 बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास 430 कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.
यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी 2020 मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हहा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.