नांदायला येत नाही म्हणून नव-याने बायकोचे डोके भिंतीवर आपटले
भोसरी (वास्तव संघर्ष) :नांदायला येत नाही म्हणून पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटले. त्यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी एक वाजताच्या सुमारास आळंदी रोड येथे घडली.
याप्रकरणी पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
आनंद जगदेवआप्पा धनशेट्टी (वय 32, रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पती यांच्यात वाद झाल्याने फिर्यादी माहेरी राहत होत्या. त्यावरून आरोपीने तू घरी का राहायला येत नाहीअसे म्हणत लोखंडी गजाने मारहाण केली. फिर्यादी यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांना गंभीर जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.