क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीमधील एटीएम मशीन फोडताना पोलिसांनी केली दोघांना अटक

File photo

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरीमधील एटीएम मशीन फोडून सिसिटिव्हीचे नुकसान करताना दोघांना पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.11) राञी दिडच्या सुमारास खराळवाडीतील कॅनरा बँक एटीएम व ॲक्सीस बँक एटीएम येथे घडली आहे.

पोलिस शिपाई स्वप्नील झनकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चैतन्य पांडुरंग चौधरी (वय-22), भानुदास अण्णा दिघे , वय-23, दोघेही रा. कोयाळीगाव, आळंदीजवळ, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राञी दिडच्या सुमारास खराळवाडीतील कॅनरा बँक एटीएम व ॲक्सीस बँक एटीएम हे लोखंडी पहार व पक्कड यांच्या एटीएम फोडुन सी.सी.टी. व्ही. कॅमे-याचे नुकसान करून एटीएम मधुन पैसे चोरुन नेण्याचा प्रयत्न करीत असतांना मिळुन आले आहेत. अधिक तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करित आहेत.

Share this: