म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे तर सदस्यपदी शैलेंद्र मोरे आणि स्वाती ढमाले यांची निवड
पुणे(वास्तव संघर्ष) पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधीलच शिवसेनेचे कार्यकर्ते शैलेंद्र मोरे आणि स्वाती ढमाले यांचीही पुणे म्हाडाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
भाजप-शिवसेना युती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या विविध महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेचे कार्यकर्ते शैलेंद्र मोरे आणि प्राधिकरणातील स्वाती ढमाले यांची पुणे म्हाडाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.