क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

फिनिशिंग मशिनमध्ये अडकुन कामगाराचा मृत्यू ; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमधील स्पॅको कंपनीतील फिनिशिंग मशिनमध्ये अडकुन छातीवर दाब पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि 23)रोजी दुपारी दिडच्या सुमारास घडली आहे. याबाबत कंपनी मालकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे .

बिबिशन किर्तन महाकुड( वय २३ वर्षे रा. स्वप्ननगरी रुम नं ९ मोरेवस्ती चिखली) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांचे नाव आहे.

बाळकृष्ण किर्तन महाकुड (वय ३० रा . स्वप्ननगरी मोरेवस्ती चिखली) यांनी पिंपरी पोलीस फिर्याद दिली आहे

हरिशचंद्र बापुराव कलमे (वय ४६ वर्ष, प्लॅट नं ०४ मोरेवस्ती क्रिएटीव रेन्बो अर्पा , सेक्टर नं ०६ मोशी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी दिडच्या सुमारास
फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा बिबिशन किर्तन महाकुड हा कंपनीतील वायब्रो फिनिशिंग मशिनवर काम होता. त्या मशिनची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जाणे अपेक्षित असताना देखील कोणत्याही व्यक्तीच्या जिवीतास धोका निर्माण होवु शकतो हे माहित असताना सुध्दा देखभाल करण्यास आरोपी हरिशचंद्र बापुराव कलमे याने हयगय व निष्काळजीपणा केला . या कारणावरून मशिनमध्ये बिघाड होवुन फिर्यादीची पुतन्या बिबिशन किर्तन महाकुड हा वायब्रो मशिनमध्ये अडकुन त्याच्या छातीवर दाब पडुन त्याचा मृत्यु झाला.अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: