वास्तव संघर्ष बातमीची दखल..! अखेर त्या पोलिस चौकीत हजर झाले पोलीस अधिकारी
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील पोलीस चोकीत पोलीस अधिकारी हरविले असल्याची बातमी वास्तव संघर्ष ने दिनांक २० नोव्हेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेऊन सदरील पोलीस चौकीत अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
याबाबत राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष माऊली बोराटे यांनी पोलीस आयुक्त आणि वास्तव संघर्षचे आभार मानले आहेत. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मोशी पोलीस चौकी येथे नेमणुक केलेले पोलीस अधिकारी नियुक्त असून देखील गेली अनेक महिने पोलीस चौकी औस पडली होती , मोशी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी संपर्क करून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत असलेली मोशी पोलीस चौकी येथे काही पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे निर्दशनास आले .माञ मोशी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी येथील नागरिक वारंवार जातात पण येथे तक्रार घेण्यासाठी पोलिसच नव्हते.
आमच्या पक्षातर्फे पोलीस चौकीची मागणी आम्ही २९ आॅक्टो २०१० ला केली माञ वारंवार पञ व्यवहार करून देखील त्या पञाची दखल घेतली जात नव्हती. अखेर २० नोव्हेंबर २०२० रोजी पञ व्यवहार करून वास्तव संघर्ष ला बातमी येताच सदरील पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी हजर झाले आहेत . यामुळे येथील नागरिकांना पोलीस तक्रार देण्यासाठी पायपीट करीत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी न जाता मोशी पोलीस चौकीतच तक्रार दाखल केली जाईल. यामुळे नागरिकांच्या आणि पक्षाच्या वतीने समाधान आणि आभार प्रकट केले आहेत.