बातम्यामहाराष्ट्र

सुनीता फाउंडेशन व झुंज दिव्यांग संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी ;सन्मानचिन्ह देऊन केला मान्यवरांचा सत्कार

तळेगाव (वास्तव संघर्ष) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सुनीता फाउंडेशन व झुंज दिव्यांग संस्थेच्या संयुक्त विद्यमानेवतीने सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. तळेगाव येथील मराठेनगर याठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात.

तसेच या कार्यक्रमामध्ये सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचा व स्त्रियांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सुनिता फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल मोरे, झुंज दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजू हिरवे , नूतन रोहमारे , गणेश रोहमारे, तानाजी मराठे ,दिनेश फाटक, बाबासाहेब मुळे, सिद्धेश्वर सोनवणे ,दिलीप काळे, सारिका राजपूत ,हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयन बाळसराफ व कार्यक्रमाचे आभार शारदा गांगुर्डे यांनी केले.

Share this: