क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मोशीतील स्पाईन मॉलच्या इमारतीवरून पडून तरूणांचा जागीच मृत्यू

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील स्पाईन मॉलच्या इमारतीवरून पडून सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे . ही घटना गुरुवारी ( दि . 12 ) पहाटे उघडकीस आली .

प्रवीण चंद्रकांत जाचक ( वय 28 , रा.संजय गांधी नगर , मोशी ) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रवीण हा मोशीतील स्पाईन मॉलच्या पहिल्या मजल्यावर ड्युटी करीत होता . पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास तो इमारतीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली . त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . याबाबत आकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे . या मॉलमधील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे . एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे अधिक तपास करीत आहेत .

Share this: