बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

अश्विनीताई जगतापांचे ‘पाॅलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ पाहून विरोधक झाले हैराण

चिंचवड (वास्तव संघर्ष): सध्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक सुरू आहे. भाजपने दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. पतीच्या निधनाला 50 दिवसही पूर्ण झालेले नसताना अश्विनी जगताप दुःख बाजूला सारून निवडणूक लढवत आहेत.पतीला अग्नी दिल्यानंतर आता निवडणूक प्रचारातच त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यावर आली आहे. त्या संपूर्ण जगताप कुटुंबासोबत बुधवारी सकाळी पतीच्या स्मृतीस्थळावर गेल्या. तेथे डोके टेकवून त्यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. डोळ्यात अश्रूंसोबत हात जोडून त्यांनी पती लक्ष्मण जगताप यांना अभिवादन केले. 

मात्र या दुख:तून सावरत असतानाच अश्विनीताईंनी आपला शांत आणि संयमी स्वभाव सोडला नाही तसेच त्यांनी राजकारण्यांसमोर नवा आदर्श निर्माण घालून दिला आहे. ‘पॉलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ करत विरोधकांकडून झालेल्या टीकेला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तसंच असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील केलं आहे. त्यामुळेच की काय आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अश्विनीताईना पाठिंबा जाहीर केला आहे.

यासंदर्भात अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “माझे पती आणि शहराच्या विकासाचे शिल्पकार आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आम्हा जगताप परिवारावरच नाही तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकांवर दुःखाचे डोंगर कोसळले. या दुःखातून सावरण्यासाठी राज्यातील आणि शहरातील अनेक नेत्यांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी आम्हाला आधार दिला. आमच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आमच्या घरी येऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच माझ्याशी संवाद साधून कोणत्याही प्रसंगात भावासारखे पाठीशी उभे राहण्याचे वचन त्यांनी मला दिले होते.

Share this: