क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीयांनी केले असे काही ;वाचून तुम्हाला बसेल धक्का

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये एकिकडे गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या गुंडांची दहशत पाहायला मिळत असताना दुसरीकडे पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीयांनी एकाला बेदम मारहाण करून दुकानातील रक्कम चोरली आहे ही घटना गुरुवारी ( दि. 10 ) सकाळी साडेदहा चिखलीतील कुदळवाडी येथे घडली.

मोहम्मद रज्जाक अब्दुलरौफ चौधरी ( वय 32 , रा . कुदळवाडी , चिखली ) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

ऋतू संजय जगताप ( वय 22 ) , अलिशा संभाजी पवार ( वय 33 ), मन्नत गोरख खवळे ( वय 22 , तिघे रा . टाळगाव चिखली ), किरण बाळू वाघ ( वय 26 , रा . मोहननगर , चिंचवड ) , अर्चना दत्ता शिंदे ( वय 21 , रा . विघ्नहर्ता चौक , चिखली ) अशी अटक केलेल्या तृतीयपंथी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी रज्जाक यांचे कुदळवाडी येथे मेन रोडवर राजा एंटरप्रायजेस नावाचे भंगारचे दुकान आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता आरोपी तृतीयपंथी या फिर्यादी रज्जाक यांच्या दुकानात पैसे मागत होते. सुट्टे पैसे नसल्याने त्यांनी ‘अभी कुछ भी धंदा नहीं हुआ थोडी देरबाद आओ ‘असे म्हटले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी रज्जाक यांना शिवीगाळ करत दुकानासमोर कपडे काढून नग्न होण्याची धमकी दिली तसेच मोठमोठ्याने टाळ्या वाजवून सर्वजण दुकानात घुसले. तसेच फिर्यादी रज्जाक यांच्या भावाला आरोपी तृतीयपंथीयांनी मारहाण केली . दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमधून चार हजार 200 रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली. अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: