क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

संभाजी भिडेला विरोध आंबेडकरी कार्यकर्ते पोलीसांच्या नजरकैदेत

पिंपरी(वास्तव संघर्ष) : शिवांजली सखी मंच आयोजित इंद्रायणी थडी कार्यक्रमाप्रसंगी आज शनिवार (दि. 28)जानेवारी 2023 रोजी गावजत्रा मैदान भोसरी याठिकाणी भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणात मुख्य आरोप असणारे संभाजी भिडे उपस्थित राहणार असल्याचा आशयाचे फ्लेक्स शहरभरात लावण्यात आले होते.त्यावरून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त करीत संभाजी भिडेला विरोध करण्याचा पवित्रा घेतला होता मात्र पिंपरी पोलीसांनी संबंधित आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलीस नजरकैदेत ठेवले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष- देवेंद्र तायडे, शहर सचिव- राजेंद्र साळवे, संघटक-विष्णू सरपते, कोषाध्यक्ष शारदाताई बनसोडे,लढा यूथ मूव्हमेंट चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर,अतिश नागटिळक,श्याम कसबे यांना पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नजरकैदेत ठेवले आहे.

भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणी महाराष्ट्रातील सर्वात पहिली फिर्याद ही पिंपरी चिंचवड शहरात नोंदविण्यात आली होती. त्यामधे संभाजी भिडेंवर आरोप करण्यात आले होते. ही बाब लक्षात घेता संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी पक्ष, संघटनांसह जनतेतुन भिडेंच्या उपस्थित बद्दल संताप व्यक्त केला जात आहे, भिडे यांची वक्तव्ये नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत.

त्यांच्या उपस्थितीने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच भिडेना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यास बंदी घालावी अन्यथा लोकशाही मार्गाने भिडेंविरोधीत निदर्शने करण्यात येऊन निषेध केला जाईल असा इशारा लढा यूथ मूव्हमेंटने आणि शहरातील आंबेडकरी पक्ष आणि कार्यकर्त्यांनी दिला होता.

Share this: