बातम्या

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन;राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहीली श्रध्दांजली

वास्तव संघर्ष आॅनलाईन :-केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. 74 वर्षीय पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्विटर वरून याबाबत माहिती दिली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहीली श्रध्दांजली

केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय असलेला दलितांचा द्रष्टा नेता; संसदीय राजकारणातील दलितांचा लोकप्रिय चेहरा हरपला आहे . त्यांच्या निधनाने देशाचे नुकसान झाले आहे. भारतीय राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत रामविलास पासवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Share this: