बातम्या

संभाजी भिडे म्हणजे भगवा दहशतवाद ;भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपींना अटक करा

पिंपरी (वास्तव संघर्ष ) भीमा कोरेगाव घटनेतील आरोपी ‘संभाजी भिडे’ हे म्हणजे भगवा दहशतवाद आहेत. त्यांच्यावर 2 जानेवारी 2018 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात कलम 307 व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू आजपर्यंत त्यांना व त्यांच्या इतर साथीदारांना अटक झाली नाही. तसेच या प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले इतर गुन्हे मागे घेण्याबाबत शासन निर्णयानुसार त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांनी केली.

भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीतील आरोपी असणा-या संभाजी भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी (दि.14 सप्टेंबर) सत्याग्रह आंदोलन रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, सुवर्णा डंबाळे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे तसेच लढा यूथ मूव्हमेंट चे प्रमोद क्षिरसागर, सचिन वाघमारे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीस अधिका-यांना आपले निवेदन दिले.यावेळच्या मनुवादी सरकार ने पाठीशी घातलेल्या संभाजी भिडे व ईतर फरार आरोपींना आघाडी सरकारने भीमा कोरेगाव हल्ला केल्या प्रकरणी त्वरित अटक करावी अशी मागणी सदरील निवेदनात केली आहे.

Share this: