बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्या मोशी महावितरण शाखा अभियंता विक्रांत वरूडे यांचे निलंबन करा – विजय जरे

भोसरी (वास्तव संघर्ष) :मोशी येथील महावितरण शाखा अभियंता विक्रांत वरूडे यांच्यावर एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. माञ विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही सदरील शाखा अभियंतावर महावितरणकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यासंदर्भात या शाखा प्रमुखाला तातडीने निलंबित करुन कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीकारी सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निलंबन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी या निवेदनात केली आहे.

जरे यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की ,मोशी शाखा अभियंता विक्रांत वरुडे यांच्यावर डिसेंबर २०१ ९ मध्ये महिलेने विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती . पोलिसांनी वरुडे यांच्यावर आयपीसी ३५४ , ३५४ ( डी ) नुसार दिनांक 10 डिसेंबर 2019 या दिवशी गुन्हा दाखल केला होता . या घटनेला ९ महिने उलटून जाऊनही आजपर्यंत महावितरणने वरुड़े यांच्यावर कारवाई केली नाही . शासकीय नियमानुसार विनयभंग सारख्या गुन्ह्याला माफी नाही आणि अशा कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित केले जाणे गरजेचे होते जे आपणाकडून केले गेलेले नाही .

राज्यात आणि देशभरात महिलांबाबत घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनांना पायबंद लागावा म्हणून शासनाचे कडक नियम राबविण्याचे आदेश आहेत.असे असताना आपण अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला सांभाळत आहात असा संदेश यामधून जात आहे . संबंधित महिलेने न्याय मिळावा म्हणून छावा संघटनेकडे विनंती केली आहे . त्यानुसार आपणांकडे आम्ही याबाबत दाद मागत आहोत . संबंधित महिलेचा तक्रार अर्ज सोबत जोडत आहोत त्यानुसार तत्काळ वरुडे ला निलंबित करावे अथवा तातडीने बदली करण्यात यावी . याबाबत पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी .असे निवेदनात म्हटले आहे.

Share this: