जागतिक महिला दिनानिमित्त उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने कचरावेचक महिलांचा सन्मान
पिंपरी (वास्तव संघर्ष) ‘8 मार्च जागतिक महिला दिन’ या दिनानिमित्त उत्कर्ष महिला प्रतिष्ठानच्या वतीने कचरावेचक महिलांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.पिंपरी-चिंचवड परिसरातील कचरावेचक महिला आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत असतात, तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी अनेकदा स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता इतरांच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या कामातून पार पाडत असताना दिसून येतात..
महिला उत्कर्ष प्रतिष्ठानने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठानच्या प्रमुख उत्कर्षा शेळके यांनी ही माहिती दिली. महिला दिनाचा आनंद वंचित महिलांपर्यंत पोहोचावा, यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत असून या महिलांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन हा सन्मान करण्यात येणार आहे. सकाळी 8 पासून या उपक्रमाला प्रारंभ होणार झाला , असे उत्कर्षा शेळके यांनी सांगितले.