बातम्यामहाराष्ट्र

दलित पँथरचा महानायक हरपला;राजा ढाले यांचे दु:खद निधन

वास्तव संघर्ष आॅनलाईन – दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे दु:खद निधन झाले आहे. आज सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवारी म्हणजे १७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवसस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आता त्यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात येत असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.

राजा ढाले यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच आंबेडकरी जनतेत तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार; मार्गदर्शक; दलित पँथरचा महानायक हरपला’, अशी शोकभावना व्यक्त करून समाजकल्याण   सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  दिवंगत राजा ढाले यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.

Share this: