बातम्यामहाराष्ट्र

मी सत्तेचा भुकेला नाही जनाधार माझी सत्ता ;भाजपची राज्यसभेची ऑफर खोटी -प्रकाश आंबेडकर

मुंबई (वास्तव संघर्ष) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने वंचित बहुजन आघाडी चे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी देण्याची आॅफर दिली अशी बातमी येत असतानाच आंबेडकरांनी यावर अखेर पडदा टाकला आहे . मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलं.

यावेळी आंबेडकर म्हणाले, भाजप मला राज्यसभा देणार हे बोललं जात होतं, मात्र त्यात काही तथ्य नाही. मी सत्तेचा भुकेला नाही. इतके वर्षे मी जनाधार जमवला आहे, ही माझी सत्ता आहे,तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Share this: