क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

बैलगाडा शर्यतीचा नाद आला अंगलट ;पिंपरी चिंचवडमध्ये 15 जणांवर गुन्हा दाखल



चिखली (वास्तव संघर्ष) : सर्वोच्च न्यायालयाने सशर्त बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यावर महाराष्ट्र राज्यात सगळीकडे परवानगीसाठी धावाधाव सुरू झाली.  मात्र  पिंपरी चिंचवडमधील काही हौशी बैलगाडा आयोजकांना ही शर्यत चांगलीच महागात पडली असून या प्रकरणी एकूण 10 ते 15 जणांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस शिपाई बाजीराव चौधरी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राजु नेवाळे, सारंग मोरे  दिपक साने रविंद्र जाधव व इतर 10 ते 15 आनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास बैलगाडा शर्यतीचा घाट, पाटीलनगर , बग वस्ती रोड , चिखली येथे आरोपींनी  सर्वोच्च न्यायालयाने उक्त दि 16 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार घटनापिठाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहुन महाराष्ट्र प्राण्यांना कुरतेने वागण्यास प्रतिबंध करण्याबाबत ( बैलगाडा शर्यतीचे आयोजन ) नियम 2017 मध्ये विहीत करण्यात आलेल्या नियम व अटी शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असताना आरोपींनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या अटी/शर्तीचे काटेकोरपणे अनुपालन केले नाही व मा.जिल्हा अधिकारी यांची परवानगी न घेता बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले. तसेच लोकांच्या जीवितास धोकादायक असलेल्या कोरोना या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेले हयगयीचे कृत्य करून लोकांची गर्दी जमवली व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त  यांच्या आदेशाचे अनुपालन केले नाही. म्हणून आरोपी विरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this: