क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

‘संविधान’ बदलण्याची भाषा करणाऱ्यावर झाला गुन्हा दाखल

पिंपरी(वास्तव संघर्ष) :करनी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर याने भारतीय संविधान बदलण्याची गरज असल्याचे वादग्रस्त वक्तव्य चिखली येथे केले होते मात्र ही भाषा त्याला भोवली असून चिखली पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राष्ट्र प्रतिष्ठेचा अपमान प्रतिबंधक कायदा,1971 च्या कलम 2 नुसार त्यांच्याविरुद्ध पनवेल पोलिस ठाणे (जि.रायगड) येथे झिरो झिरोने गुन्हा नोंद करण्यात आला. प्राथमिक तपासात तो पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत घडल्याने नंतर तो इकडे वर्ग करण्यात आला.

त्याबाबत प्रभाकर शाबा कांबळे (वय47 , रा.नवीन पनवेल) यांनी फिर्याद दिली आहे.

मात्र,या गुन्ह्यात सात वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यात अटकेची कारवाई न करता पोलिस न्यायालयात थेट दोषारोपपत्रच दाखल करणार आहे.मात्र,तत्पूर्वी सेंगर याला बोलावून नोटीस बजावत समज देण्यात आली असल्याचे चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी आज सांगितले.

अकबराचा फोटो महापुरुष म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय संविधानात असल्याने संविधानच बदलण्याची गरज असल्याचे सेंगर याने एका यू ट्यूब चॅनेलला मोरेवस्ती,चिखली येथील कार्यक्रमानंतर दिलेल्या मुलाखतीत 19जानेवारी रोजी सांगितले होते.अकबराचा उदो,उदो करणारे संविधान नको.गांधी व आंबेडकर मार्ग त्याग करून शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या मार्गावरून चालणे फार जरुरी आहे, असे तो म्हणाला होता.संविधानाप्रती अनादर दाखविणारे व बेअदबी करणारे वक्तव्य केल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. त्यात तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Share this: