क्राईम बातम्याबातम्या

धक्कादायक : पिंपरीतील गांधीनगर येथे वयोवृद्धाच्या अंगावर घातली क्रेन ;वयोवृद्ध जागीच ठार

पिंपरी (वास्तव संघर्ष) -पिंपरीतील गांधीनगर येथे भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेनने चिरडल्याने एका वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे . ही घटना आज , शनिवारी ( दि . 22 ) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली .

बबन केरु साळवे ( वय 60 , रा . गांधीनगर , पिंपरी ) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , साळवे दुपारी साडेतीनच्या सुमारास गांधीनगर येथील सार्वजनिक शौचालयाकडून घराच्या दिशेने पायी जात होते . आजूबाजूला पाहून रस्ता ओलांडून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात क्रेन आले . क्रेनने त्यांना चिरडले . यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने साळवे यांचा जागीच मृत्यू झाला . अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे . पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे . पिंपरी पोलीस तपास करीत आहेत .

Share this: