क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून महीलेवर वारंवार बलात्कार

वाकड (वास्तव संघर्ष) : लग्नाचे आमिष दाखवून महीलेवर वारंवार बलात्कार करण्यात आला आहे . तसेच लग्नास नकार देऊन फसवणूक केली आहे . ही घटना मार्च 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत थेरगाव येथे घडला.वाकड पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश सुधाकर पाटकर ( वय 26 , रा . थेरगाव ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी पिडीत महिला व आरोपी एकाच ऑफिसमध्ये काम करतात त्यांची मैत्री होती . आरोपीने फिर्यादी महिलेला एक दिवस जेवण बनवून देण्यासाठी घरी बोलावले आणि लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती बलात्कार केला . त्यानंतर वारंवार इतर ठिकाणी घेउन जात शारिरीक संबंध प्रस्थापित केले . दुस – या मुलीशी लग्न केल्याचे सांगून आरोपीने लग्नास नकार दिला व मारहाण आणि शिवीगाळ करून शारिरीक संबंध प्रस्थापित केले. अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत .

Share this: