चिंबळी येथील एटीएम चोरट्यांनी फोडले ;सिसिटिव्हीत दिसू नये म्हणून कॅमे-याला मारला स्प्रे
पिंपरी(वास्तव संघर्ष) :गेल्या काही महिन्यांपासून एटीएम मशीन फोडणाऱ्या चोरट्याचे सञ थांबले होते. मात्र गेल्याच आठवडय़ात नवीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारताच एटीएम मशीन फोडणाऱ्या चोरट्यानी पुन्हा आपला कारनामा दाखवण्यास सुरूवात केली आहे .
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी येथे चोरट्यांनी एटीएम सेंटर फोडून रोकड लंपास केली आहे . हा प्रकार रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे . आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिमळी गावापासून 100 मीटर अंतरावर हिताची मनी स्पॉट एटीएम सेंटर आहे . या एटीएम सेंटरचा खालचा भाग गॅस कटरच्या सहाय्याने कट केला आहे .चोरट्यांनी या एटीएम सेंटर मधून रोकड लंपास केली आहे .
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेहमी प्रमाणे सीसीटीव्ही फुटेज कुठे मिळते का याचा शोध घेत आहेत . या एटीएम सेंटर बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत . एटीएम मशीनला असणाऱ्या कॅमे-याला चोरट्यांनी स्प्रे मारला आहे . त्यामुळे त्यामध्ये स्पष्ट दिसत नाही .अधिक तपास पोलीस करीत असुन चोरट्यांच्या मार्गावर पोलीस आहेत.