माझं पिंपरी -चिंचवड

पळून जाणाऱ्या संजोग वाघेरे यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये-एकनाथ पवार

पिंपरी (वास्तव संघर्ष) – आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून जन्मापासून सत्ता उपभोगूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना ते राहत असलेल्या पिंपरीगावचा विकास करता आलेला नाही.

मात्र, भाजपने पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत सत्ता केल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आत पिंपरीगावातील विविध प्रकल्प आणि विकासकामे करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे वाघेरे यांचा तिळपापड होत असून ते भाजपवर असभ्य, बेछूट तसेच खालच्या पातळीवर आरोप करीत आहेत. संजोग वाघेरे यांच्या आडनावातच वाघ आहे. मात्र प्रत्यक्षात ते “भिगी बिल्ली” आहेत. त्यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला होता. पण मी जनतेच्या दारात जाऊन त्यांचा कौल घेतला. त्यामुळे पळून जाणाऱ्या संजोग वाघेरे यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये, असे सडेतोड प्रत्युत्तर महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिले आहे.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केलेल्या टिकेला पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे हे जन्मापासूनच २०१७ पर्यंत सत्तेत होते. आधी काँग्रेस नंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता उपभोगली आहे. इतकी वर्षे सत्ताधारी असलेल्या वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड शहराचे सोडाच मात्र त्यांना त्यांच्या स्वत:च्या वार्डाचा विकास करता आलेला नाही. त्यांचा केवळ आपल्या पुर्वजांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करण्याचा अट्टाहास असतो. पिंपरीगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नुतनीकरणाचे व सुशोभिकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणूक जसजसी जवळ येत आहे तसतशी शहरातील राजकारणही तापत आहेत आता वाघेरे यांना भिगी बिल्ली म्हणना-या एकनाथ पवार यांना काय प्रतुत्तर भेटणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share this: