क्राईम बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात हत्याकांड :पतीने पत्नीसह केली अडीच वर्षांच्या चिमुकलीची धारधार शस्ञाने हत्या

पत्नीवर आणि मुलीवर वार केल्यानंतर आयाजने स्वत:वर देखील वार करुन घेतले असून ‘मै किसको नहीं छोडूंगा, निकल जाओ मेरे घरसे’ असा रक्ताने भिंतीवर मजूकरही लिहिला आहे.

पुणे (वास्तव संघर्ष) पुण्यात ताडिवाला रोड भागात भीषण हत्याकांड घडले आहे. पतीने घरगुती वादातून पत्नी आणि अडीच वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या केली आहे.  मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीत हे हत्याकांड घडले आहे. आरोपी पती आयाज शेख याने पत्नी तबस्सुम शेख आणि अडीच वर्षाची मुलगी अलिना शेख या दोघांची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केली आहे. या घटनेची माहिती कळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तेथून  चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आयाजला ताब्यात घेतले आहे.

आरोपी पती आयाज आणि त्याची पत्नी तबस्सुम हे दोघे वेगळे राहत होते. त्यांच्यामध्ये घटस्फोटासाठी कोर्टात केस सुरु आहे, किरकोळ वादामुळे चिडलेल्या आयाजने पत्नीच्या माहेरी जाऊन पहाटे झोपेत असतानाच तिच्यावर आणि अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या गळ्यावर वार केले. यात त्या दोघींचा मृत्यू झाला आहे. चिडलेल्या आयाजने पत्नीची हत्या केल्यानंतर घराच्या भिंतीवर ‘मै किसको नहीं छोडूंगा, निकल जाओ मेरे घरसे’ असा असा रक्ताने भिंतीवर मजूकरही लिहिला आहे.

पत्नीवर आणि मुलीवर वार केल्यानंतर आयाजने स्वत:वर देखील वार करुन घेतले असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत

Share this: