अडचणीत आला म्हणून विजय माल्या चोर ठरत नाही – नितीन गडकरी
वास्तव संघर्ष – किंगफिशरचा मालक विजय माल्या यांने बॅंकेला चुना लावून देशाबाहेर पळून गेला आहे, तो देशात परत यावा यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे सरकारमधलेच एक वरीष्ठ मंत्री नितीन गडकरी मात्र विजय माल्याचे कौतुक करीत आहेत.
“जो माणूस अडचणीत येतो त्याच्यावर जर आपण तो चोर असल्याचा शिक्का मारत असू तर हे आपल्या अर्थव्यवस्थेला पुढे नेणारं नाही. ही मानसिकता आपल्या अर्थव्यवस्थेला मारक आहे.”
विजय माल्यासारख्या उद्योजकाला त्याच्या एखाद्या आर्थिक अपराधाबद्दल त्याच्यावर लगेच गुंड असल्याचा शिक्का मारणं बरोबर नाही, त्याने चाळीस वर्षे हप्ता भरला फक्त त्याने एक हफ्ता भरला नाही म्हणुन तो चोर ठरत नाही असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं यासंदर्भात बॅंकिंग फायनान्स क्षेञात खळबळ उडाली आहे.
इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलंय.