क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मी दापोडीचा भाई मला हप्ता दे.. असे म्हणून एकाला बेदम मारहाण

भोसरी (वास्तव संघर्ष): तु मला ओळखत नाहीस का,मी दापोडीचा भाई आहे .मला दर महिन्याला हप्ता द्यायचा असे म्हणून एका पानटपरी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि.1) रोजी 2:31 दरम्यान आठवण पानशॉप, छत्रपती शिवाजी महाराज चौक दापोडी येथे घडली आहे.

कुणाल बाळासाहेब पवार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सुमेध ऊर्फ गोटया गायकवाड,बॉक्सी पठारे ( दाघे रा. सिध्दार्थ नगर,दापोडी) या आरोपींना पोलिसांनी अटक केलीआहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचे आठवण पानशॉप येथे काम करीत, मित्रांसह गप्पा मारत असताना आरोपी यांनी सदर ठिकाणी येवुन फिर्यादींना खाण्याचे पान मागीतले. म्हणून फिर्यादींनी त्यांना पान देवुन पानाचे पैसे मागीतले असता आरोपी सुमेध ऊर्फ गोटया याने तु मला ओळखत नाहीस का मी दापोडीचा भाई आहे.आणि तु माझेकडे पैसे मागतो असे म्हणुन फिर्यादींना शिवीगाळ केली. फिर्यादींनी शिवीगाळ का करतो. असे त्यास विचारले असता त्याचा राग येवुन आरोपींनी फिर्यादींची कॉलर पकडुन त्यांना पानटपरीचे बाहेर ओढुन हाताने मारहाण केली.

त्यास फिर्यादींनी विरोध केला असता आरोपींने त्यांना मारहाण करीत त्यांचे शर्टच्या खिशात हात घालून त्यातील 1450 रूपये व फिर्यादी यांचे पानटपरीतील पैशांचा गल्ला उघडुन दिवसभर केलेल्या धंद्याचे अंदाजे 5575 रुपये असे एकूण 7025 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यामुळे फिर्यादीचे मित्र सोडविण्यासाठी मध्ये आले असता आरोपी त्यांना शिवीगाळ करून मधे पडलात तर तुम्हालाही सोडणार नाही. अशी त्यांना धमकी दिली. तसेच आरोपी बॉक्सी पठारे याने फिर्यादींना पकडुन ठेवले तर आरोपी सुमेध ऊर्फ गोटया याने “मी दापोडीचा भाई आहे ,हे चालू महिन्याचे यापुढे प्रत्येक महिन्याला मला गुपचुप हप्ता दयायचा .नाही दिला तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्याचे सहा.पो. निरिक्षक कल्याण घाडगे तपास करत आहेत.

Share this: