क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

घरात घूसून महिलेला शिवीगाळ करणा-या मनसेच्या महिला पदाधिका-यावर गुन्हा दाखल

सांगवी (वास्तव संघर्ष) : एका महिलेच्या घरात घुसून तुम्हाला ‘सुन नांदवता येत नाही का’ असे म्हणून शिवीगाळ करणा-या पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला व पदाधिकाऱ्यांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9)रोजी साडेअकराच्या सुमारास पवारनगर गल्ली नंबर – 1 जुनी सांगवी येथे घडली आहे.

मंदाकिनी विलास पाटील (वय-62 रा. पवारनगर गल्ली नं- 1 जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कावेरी भास्कर भागवत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उज्वलाताई भोसले व त्यांचे इतर साथीदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी साडेअकराच्या सुमारास पवारनगर जुनी सांगवी येथे फिर्यादी मंदाकिनी यांच्या राहत्या घरी आरोपी कावेरी या त्यांच्या सून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उज्वलाताई भोसले व त्यांचे इतर साथीदार यांचेसह घेऊन आल्या.फिर्यादी मंदाकिनी यांच्याघरात जबरदस्तीने त्या घरात घुसल्या तसेच त्यांना शिविगाळ करीत म्हणाल्या ‘तुला सुन नांदवता येत नाही का असे म्हणून शिवीगाळ केली. आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सांगवी स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रूपनर करित आहेत.

Share this: