बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काॅग्रेसकडून दुसरी यादी जाहीर, मावळ मधून पार्थ पवार, तर शिरुरमधून अमोल कोल्हे

मुंबई (वास्तव संघर्ष  राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पाच जणांची नावे आहेत मावळमधून पार्थ पवार, शिरूर मधून डॉ. अमोल कोल्हे नाशिकमधून समीर भुजबळ तर बीड – बजरंग सोनवणे,आणि दिंडाेरी – धनराज महाले, यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत याबाबतची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केल्यानंतर आज (शुक्रवारी) दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अमोल कोल्हे – शिरूर, समीर भुजबळ- नाशिक, बजरंग सोनवणे- बीड, आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढामधून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपनं हा आपला विजय असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. यावर बोलताना शरद पवार यांनी भाजप-सेनेला घाबरून नाही तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. यापूर्वी त्यांनी भाजपचा पराभव केला आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टिका केली. अत्यंत बहुचर्चित ठरलेल्या पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरुरमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या गळ्यात पडली आहे. नाशिकमधून समीर भूजबळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

Share this: