बातम्या

कोर्टात आरोपींना जामीन मिळण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्याला टोळीला पिंपरी पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड न्यायालयात गंभीर गुन्हयात अटक झालेल्या आरोपींची जामीनावर सुटका करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीला पिंपरी पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.15) रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोरवाडी अंबिका वजन काटयासमोरील रोडवर घडली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रोहित सुधाकर पिंजरकर यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुनिल मारुती गायकवाड( वय -52 वर्षे रा . पी डी सी बँके शेजारी चावडी चौक , आळंदी , ता . खेड , जि.पुणे ) नंदा एकनाथ थोरात , वय-43 वर्षे , रा .इंद्रायणी नगर , कॉलनी नंबर- 1 आळंदी पुणे ) पौर्णिमा प्रशांत काटे , वय – 30 वर्षे , रा .आळंदी , ता . खेड , जि.पुणे) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोरवाडीतील अंबिका वजन काटयासमोरील रोडवर यातील तीनही आरोपी यांनी मा. न्यायालयात गंभीर गुन्हयात अटक झालेल्या आरोपींना जामिन करुन देण्यासाठी बनावट आधार कार्ड , रेशनिंग कार्ड ,ईत्यादी सारखे खोटे शासकीय दस्तऐवज तयार करून जामीनदार म्हणुन हजर रहात होते. विशेष म्हणजे ही टोळी ज्या आरोपींना जामीनदार मिळत नाही. तसेच जे आरोपी जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा कोर्ट कामासाठी हजर राहणार नाहीत अशा आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट नावे धारण करुन , ठराविक व ओळखीच्या वकीलांचे मागणीनुसार कोर्टात जामीनदार म्हणुन हजर होत असत.

बनावट कागदपत्रे संबंधीत कोर्टात देवुन आरोपींना कोर्टातून जामीनावर सोडवत असत. अशा प्रकारे ते बनावट कागदपत्रे न्यायालयास खरे असलेचे भासवून मा.न्यायालयाची दिशाभुल करुन वेगवेगळया गुन्हयातील अटक आरोपींचा जामीन करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वांरवार वापर केला आहे . तसेच आरोपी सुनिल गायकवाड, आरोपी नंदा थोरात, आरोपी पौर्णिमा काटे यांनी त्यांचे बनावट नावाचे बोगस कागदपत्रे पिंपरी न्यायालय येथे बोगस जामीनदार म्हणुन हजर राहणेसाठी स्वतःजवळ बाळगली आहेत. त्यामुळे या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

Share this: